Varanasi Stadium: पंतप्रधान मोदींनी वाराणसी क्रिकेट स्टेडियमची केली पायाभरणी, सचिन तेंडुलकरने दिली खास भेट (Watch Video)

वाराणसीमध्ये आयोजित या मेगा इव्हेंटमध्ये योगी आदित्यनाथ, पीएम मोदी, सचिन तेंडुलकर, बीसीसीआय सचिव जय शाह आणि इतर क्रिकेटपटू मंचावर उपस्थित होते. त्यानंतर तेंडुलकरने नरेंद्र मोदींना खास जर्सी भेट दिली.

पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांनी शनिवार, 23 सप्टेंबर रोजी वाराणसीमध्ये भगवान शिव-थीम असलेल्या क्रिकेट स्टेडियमची पायाभरणी केली. या लॉन्चिंग इव्हेंटमध्ये सचिन तेंडुलकरसह अनेक दिग्गज क्रिकेटपटू उपस्थित होते. वाराणसीमध्ये आयोजित या मेगा इव्हेंटमध्ये योगी आदित्यनाथ, पीएम मोदी, सचिन तेंडुलकर, बीसीसीआय सचिव जय शाह आणि इतर क्रिकेटपटू मंचावर उपस्थित होते. त्यानंतर तेंडुलकरने नरेंद्र मोदींना खास जर्सी भेट दिली. त्याच्या समोर टीम इंडिया लिहिलेले आहे तर मागे 'नमो' असे नाव छापले आहे. या कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी सुनील गावस्कर आणि कपिल देवही उपस्थित होते.

पहा व्हिडिओ

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)

Share Now

Share Now