PAK vs BAN 1st Test Live Score Update: पाकिस्तानने पाहिला डाव 448 धावांवर केला घोषित, कर्णधार शान मसूदचा धक्कादायक निर्णयामुळे रिझवानचे द्विशतक हुकले
PAK vs BAN: गुरुवारी दुसऱ्या दिवशी पाकिस्तानचा कर्णधार शान मसूदने धक्कादायक निर्णय घेतला. त्याने 113 षटकांनंतर पाकिस्तानचा डाव 448 धावांवर घोषित केला. मोहम्मद रिझवान द्विशतकाच्या जवळ असताना मसूदने हा निर्णय घेतला.
Pakistan National Cricket Team vs Bangladesh National Cricket Team: पाकिस्तान राष्ट्रीय क्रिकेट संघ (Pakistan National Cricket Team) विरुद्ध बांगलादेश राष्ट्रीय क्रिकेट संघ (Bangladesh National Cricket Team) यांच्यातील पहिला कसोटी सामना रावळपिंडी येथे खेळवला जात आहे. दरम्यान, गुरुवारी दुसऱ्या दिवशी पाकिस्तानचा कर्णधार शान मसूदने धक्कादायक निर्णय घेतला. त्याने 113 षटकांनंतर पाकिस्तानचा डाव 448 धावांवर घोषित केला. मोहम्मद रिझवान द्विशतकाच्या जवळ असताना मसूदने हा निर्णय घेतला. रिझवानने शानदार फलंदाजी करत 239 चेंडूत 11 चौकार आणि 3 षटकारांसह नाबाद 171 धावा केल्या, मात्र मसूदने त्याला द्विशतक पूर्ण करण्याची संधी दिली नाही. रिझवानने द्विशतक झळकावले असते तर त्याच्या नावावर मोठा विक्रम झाला असता. अशी कामगिरी करणारा तो पाकिस्तानचा केवळ तिसरा यष्टिरक्षक ठरला असता. 233 धावा करून त्याने यष्टिरक्षक म्हणून सर्वाधिक धावा करण्याचा विश्वविक्रम मोडला असता, परंतु मसूदच्या निर्णयामुळे हे होऊ शकले नाही.
That is all from the first innings. Pakistan declare at 4️⃣4️⃣8️⃣-6️⃣ 🏏
Rizwan remains unbeaten at 1️⃣7️⃣1️⃣ 👏#PAKvBAN | #TestOnHai pic.twitter.com/cjVlwfMxbF
— Pakistan Cricket (@TheRealPCB) August 22, 2024
(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)
(The above story first appeared on LatestLY on Aug 22, 2024 05:40 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).

