ENG vs NZ World Cup 2023 Toss Update: न्यूझीलंडचा कर्णधार टॉम लॅथमच्या पदरी नाणेफेक, प्रथम गोलंदाजी करण्याचा घेतला निर्णय
विश्वचषकाच्या पहिल्या सामन्यात इंग्लंड आणि न्यूझीलंडचे (ENG vs NZ) संघ एकमेकांशी झुंजत आहेत. अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर या सामन्याचे आयोजन करण्यात आले आहे.
आयसीसी क्रिकेट विश्वचषक (ICC Cricket World Cup 2023) आजपासून सुरू झाला आहे. विश्वचषकाच्या पहिल्या सामन्यात इंग्लंड आणि न्यूझीलंडचे (ENG vs NZ) संघ एकमेकांशी झुंजत आहेत. अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर या सामन्याचे आयोजन करण्यात आले आहे. हे दोन संघ 2019 च्या अंतिम फेरीत आमनेसामने आले ज्यात उत्साहाच्या सर्व मर्यादा ओलांडल्या गेल्या. अशा परिस्थितीत या सामन्यात चुरशीची स्पर्धा होईल, अशी आशा चाहत्यांना आहे. दरम्यान, न्यूझीलंडचा कर्णधार टॉम लॅथमने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे.
दोन्ही संघाची प्लेइंग 11
इंग्लंड : जॉनी बेअरस्टो, डेविड मलान, जो रूट, हॅरी ब्रूक, जोस बटलर (कर्णधार / विकेटकीपर), लियाम लिव्हिंगस्टोन, मोईन अली, सॅम करन, ख्रिस वोक्स, आदिल रशीद, मार्क वुड
न्यूझीलंड : डेव्हॉन कॉनवे, विल यंग, रचिन रवींद्र, डॅरिल मिशेल, टॉम लॅथम (कर्णधार / विकेटकीपर), ग्लेन फिलिप्स, मार्क चॅपमन, जेम्स नीशम, मिचेल सँटनर, मॅट हेन्री, ट्रेंट बोल्ट
New Zealand have won the toss and they've decided to bowl first against England.
- The World Cup is here...!!! pic.twitter.com/W3UocrDiTC
— Mufaddal Vohra (@mufaddal_vohra) October 5, 2023
(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)
(The above story first appeared on LatestLY on Oct 05, 2023 01:43 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).

