India Vs Pakistan: भारत विरुध्द पाकिस्तानची प्रत्येक मॅच ही फायनल मॅच, रविवारी होणाऱ्या भारत विरुध्द पाकिस्तान सामन्यावर Mohammad Rizwan ची प्रतिक्रीया

फक्त भारत आणि पाकिस्तान या दोन देशातचं नाही आशिया देशांच्या बाहेरील देशांना देखील या मॅचबाबत अधिक उत्सुकता असते म्हणून भारत विरुध्द पाकिस्तानची प्रत्येक मॅच ही फायनल मॅच असते, अशी प्रतिक्रीया मोहम्मद रिजवानने दिली आहे.

विराट कोहली व मोहम्मद रिझवान (Photo Credit: PTI)

पुन्हा एकदा भारत विरुद्ध पाकिस्तान (India vs Pakistan) हा हायवोल्टेज (High Voltage) सामना पार पडणार आहे. सुपर 4 चे सामने आता सुरु होणार असून रविवारी म्हणजेच 4 सप्टेबर रोजी भारत (India) विरुद्ध पाकिस्तान (Pakistan) हा महामुकाबला रंगणार आहे.तरी पाकिस्तानचा मजबूत विकेट किपर मोहम्मद रिजवानने (Mohammad Rizwan) या सामन्यावर आपली प्रतिक्रीया नोंदवली आहे. मोहम्मद रिजवान म्हणाला भारता विरुध्दचा सामना कायम दबावपूर्ण सामना असतो. फक्त भारत आणि पाकिस्तान या दोन देशातचं नाही आशिया देशांच्या बाहेरील देशांना देखील या मॅचबाबत अधिक उत्सुकता असते म्हणून भारत विरुध्द पाकिस्तानची प्रत्येक मॅच ही फायनल मॅच असते, अशी प्रतिक्रीया मोहम्मद रिजवानने दिली आहे.

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement