Team India T20 World Cup Celebration: दिल्ली मध्ये ढोल चे ताल ऐकताच थिरकले Rohit Sharma सह टीम इंडियाच्या खेळाडूंचे पाय (Watch Video)
रोहित शर्मा, सूर्यकुमार यादव, हार्दिक पांड्या आदींनी आपल्या खास अंदाजात डान्स केला.
दक्षिण आफ्रिकेला नमवत Barbados मध्ये टीम इंडियाने T20 World Cup वर जेतेपदाचं नाव कोरलं. या विजयानंतर आज मायदेशी टीम परतल्यानंतर दिल्लीत पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट घेण्यापूर्वी खेळाडू ITC Maurya मध्ये पोहचले आहेत. हॉटेलच्या गेट वर ढोल नगाड्याच्या तालावर त्यांचे स्वागत झाले. अनेक खेळाडूंना यावेळी थिरकण्याचा मोह आवरता आला नाही. रोहित शर्मा, सूर्यकुमार यादव, हार्दिक पांड्या आदींनी आपल्या खास अंदाजात डान्स केला. T20 विश्वचषक जिंकून टीम इंडिया भारतात परतली, दिल्ली विमानतळावर चाहत्यांनी केले जल्लोषात स्वागत (पाहा व्हिडिओ).
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)