IPL Mega Auction 2025: आयपीएल लिलावासाठी मल्लिका सागरकडे मोठी जबाबदारी, खेळाडूंसाठी लावणार बोली

मल्लिका आयपीएल मेगा लिलाव होस्ट करताना दिसणार आहे. ही काही पहिलीच वेळ नाही जेव्हा मल्लिका सागर आयपीएल लिलावात लिलावदाराची जबाबदारी सांभाळताना दिसणार आहे. याआधीही ती आयपीएल 2024 मध्ये लिलाव होस्ट करताना भूमिकेत दिसली होती.

Mallika Sagar (Photo Credit - X)

Mallika Sagar Auctioneer: जगातील सर्वात मोठ्या क्रिकेट लीग म्हणजेच आयपीएलच्या पुढील हंगामासाठी 24 आणि 25 नोव्हेंबर रोजी मेगा लिलाव आयोजित केला जाईल. आयपीएलचा हा लिलाव सौदी अरेबियातील जेद्दाह येथे होणार आहे. यावेळी आयपीएल लिलावात 574 खेळाडूंवर बोली लावली जाणार आहे. यावेळी खेळाडूंवर बोली लावण्याची जबाबदारी प्रसिद्ध लिलावकार मल्लिका सागर यांच्याकडे देण्यात आली आहे. मल्लिका आयपीएल मेगा लिलाव होस्ट करताना दिसणार आहे. ही काही पहिलीच वेळ नाही जेव्हा मल्लिका सागर आयपीएल लिलावात लिलावदाराची जबाबदारी सांभाळताना दिसणार आहे. याआधीही ती आयपीएल 2024 मध्ये लिलाव होस्ट करताना भूमिकेत दिसली होती. मल्लिकाला लिलावाचा प्रदीर्घ अनुभव आहे. आयपीएलच्या इतिहासातील ती पहिली महिला आहे जिने लिलाव आयोजित करण्याची जबाबदारी घेतली. मल्लिकाच्या आधी रिचर्ड मॅडले, ह्यू ॲडम्स आणि चारू शर्मा यांसारख्या दिग्गजांनी आयपीएल लिलावात लिलावकर्त्यांची भूमिका बजावली आहे.

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)

Share Now

Share Now