LSG vs GT, IPL 2024 21st Match Toss Update: लखनौने गुजरातविरुद्ध नाणेफेक जिंकली, प्रथम फलंदाजी करण्याचा घेतला निर्णय

लखनौ या सामन्यात सलग तिसरा विजय नोंदविण्याचा प्रयत्न करेल, तर गुजरात शेवटच्या सामन्यात पंजाबविरुद्धच्या पराभवाची जखम विसरण्याचा प्रयत्न करेल. दोन्ही संघांमध्ये चुरशीची स्पर्धा होणार हे नक्की.

LSG vs GT, IPL 2024 21st Match Toss Update: लखनौने गुजरातविरुद्ध नाणेफेक जिंकली, प्रथम फलंदाजी करण्याचा घेतला निर्णय

LSG vs GT, IPL 2024 21st Match: आयपीएल 2024 चा 21 वा सामना (IPL 2024) आज लखनौ सुपर जायंट्स आणि गुजरात टायटन्स (GT vs LSG) यांच्यात भारतरत्न श्री अटलबिहारी वाजपेयी एकना क्रिकेट स्टेडियम, लखनौ येथे 7.30 वाजता खेळवला जाणार आहे. या सामन्यात दोन्ही संघ यंदाच्या मोसमात पहिल्यांदाच आमनेसामने येणार आहेत. लखनौ या सामन्यात सलग तिसरा विजय नोंदविण्याचा प्रयत्न करेल, तर गुजरात शेवटच्या सामन्यात पंजाबविरुद्धच्या पराभवाची जखम विसरण्याचा प्रयत्न करेल. दोन्ही संघांमध्ये चुरशीची स्पर्धा होणार हे नक्की. दरम्यान, लखनौने गुजरातविरुद्ध नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे.

पाहा दोन्ही संघाची प्लेइंग 11

लखनौ सुपर जायंट्स (प्लेइंग इलेव्हन): क्विंटन डी कॉक, केएल राहुल (विकेटकीपर/कर्णधार), देवदत्त पडिककल, मार्कस स्टॉइनिस, निकोलस पूरन, आयुष बडोनी, कृणाल पंड्या, रवी बिश्नोई, यश ठाकूर, नवीन-उल-हक, मयंक यादव

गुजरात टायटन्स (प्लेइंग इलेव्हन): शुभमन गिल (कर्णधार), शरथ बीआर (विकेटकीपर), साई सुधारसन, विजय शंकर, राहुल तेवतिया, रशीद खान, नूर अहमद, उमेश यादव, स्पेन्सर जॉन्सन, दर्शन नळकांडे, मोहित शर्मा

(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)

(The above story first appeared on LatestLY on Apr 07, 2024 07:06 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).