RR vs LSG, IPL 2023 Match 26 Live Score Update: लखनौ सुपर जायंट्स संघाची पडली चौथी विकेट, दीपक हुडा नंतर काइल मायर्स बाद
दोन्ही संघांमधील हा सामना जयपूरच्या सवाई मानसिंग स्टेडियमवर खेळला जात आहे. विजयाची हॅट्ट्रिक करणाऱ्या राजस्थान रॉयल्स संघाला लखनौ सुपर जायंट्सविरुद्धच्या सामन्यात आपले वर्चस्व कायम राखायचे आहे.
इंडियन प्रीमियर लीगच्या 16व्या हंगामातील 26 वा सामना आज राजस्थान रॉयल्स आणि लखनऊ सुपर जायंट्स यांच्यात खेळला जात आहे. दोन्ही संघांमधील हा सामना जयपूरच्या सवाई मानसिंग स्टेडियमवर खेळला जात आहे. विजयाची हॅट्ट्रिक करणाऱ्या राजस्थान रॉयल्स संघाला लखनौ सुपर जायंट्सविरुद्धच्या सामन्यात आपले वर्चस्व कायम राखायचे आहे. या सामन्याद्वारे दोन्ही संघ आपापल्या मोसमातील सहावा सामना खेळणार आहेत. राजस्थानने आतापर्यंत 5 पैकी 4 सामने जिंकले आहेत, तर लखनौने 5 पैकी 3 सामने जिंकले आहेत. या सामन्यात दोन्ही संघांमध्ये चुरशीची लढत होणार आहे. दरम्यान, राजस्थान रॉयल्सचा कर्णधार संजू सॅमसनने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. नाणेफेक हरल्यानंतर प्रथम फलंदाजी करणाऱ्या लखनौ सुपर जायंट्सच्या संघाला चौथा मोठा धक्का बसला. दीपक हुडा 2 धावा करून पॅव्हेलियनमध्ये परतला आहे. लखनौ सुपर जायंट्स संघाचा स्कोअर 104/4.
Match 26. WICKET! 13.5: Kyle Mayers 51(42) b Ravichandran Ashwin, Lucknow Super Giants 104/4 https://t.co/vqw8WrjNEb #TATAIPL #RRvLSG #IPL2023
— IndianPremierLeague (@IPL) April 19, 2023
(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)
(The above story first appeared on LatestLY on Apr 19, 2023 08:41 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).

