RR vs LSG, IPL 2023 Match 26 Live Score Update: लखनौने रोमहर्षक सामन्यात राजस्थानचा 10 धावांनी केला पराभव, आवेश खान आणि मार्कस स्टॉइनिस यांनी केली शानदार गोलंदाजी

दोन्ही संघांमधील हा सामना जयपूरच्या सवाई मानसिंग स्टेडियमवर झाला. या सामन्यात लखनौ सुपर जायंट्सने राजस्थान रॉयल्सचा 10 धावांनी पराभव केला. या सामन्यात दोन्ही संघांमध्ये चुरशीची लढत झाली.

RR vs LSG, IPL 2023 Match 26 Live Score Update: लखनौने रोमहर्षक सामन्यात राजस्थानचा 10 धावांनी केला पराभव, आवेश खान आणि मार्कस स्टॉइनिस यांनी केली शानदार गोलंदाजी

इंडियन प्रीमियर लीगच्या 16व्या हंगामातील 26 वा सामना आज राजस्थान रॉयल्स आणि लखनौ सुपर जायंट्स यांच्यात खेळला गेला. दोन्ही संघांमधील हा सामना जयपूरच्या सवाई मानसिंग स्टेडियमवर झाला. या सामन्यात लखनौ सुपर जायंट्सने राजस्थान रॉयल्सचा 10 धावांनी पराभव केला. या सामन्यात दोन्ही संघांमध्ये चुरशीची लढत झाली. तत्पूर्वी, राजस्थान रॉयल्सचा कर्णधार संजू सॅमसनने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. नाणेफेक हारल्यानंतर प्रथम फलंदाजी करताना लखनौ सुपर जायंट्स संघाने निर्धारित 20 षटकात 7 गडी गमावून 154 धावा केल्या. लखनौ सुपर जायंट्ससाठी सलामीवीर काइल मेयर्सने सर्वाधिक 51 धावांची खेळी केली. राजस्थान रॉयल्सकडून रविचंद्रन अश्विनने सर्वाधिक दोन विकेट घेतल्या. लक्ष्याचा पाठलाग करताना राजस्थान रॉयल्स संघाला 20 षटकांत 6 गडी गमावून केवळ 144 धावा करता आल्या. राजस्थान रॉयल्सकडून सलामीवीर यशस्वी जैस्वालने सर्वाधिक 44 धावा केल्या. लखनौ सुपर जायंट्सकडून आवेश खानने सर्वाधिक तीन विकेट घेतल्या.

(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)

(The above story first appeared on LatestLY on Apr 19, 2023 11:23 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).