KKR vs RR, IPL 2023 Match 56 Live Score Update: कोलकात्याची दुसरी विकेट पडली, रहमानउल्ला गुरबाजही बाद

दोन्ही संघांमधील हा सामना कोलकाताच्या घरच्या मैदानावर असलेल्या ईडन गार्डन्स स्टेडियमवर खेळला जात आहे. कोलकाता नाईट रायडर्ससाठी आतापर्यंतचा हा मोसम खूप अस्थिर ठरला आहे.

KKR vs RR, IPL 2023 Match 56 Live Score Update: कोलकात्याची दुसरी विकेट पडली, रहमानउल्ला गुरबाजही बाद
RR

इंडियन प्रीमियर लीगच्या 16 व्या मोसमातील 56 वा सामना आज कोलकाता नाईट रायडर्स आणि राजस्थान रॉयल्स (KKR vs RR) यांच्यात खेळला जात आहे. दोन्ही संघांमधील हा सामना कोलकाताच्या घरच्या मैदानावर असलेल्या ईडन गार्डन्स स्टेडियमवर खेळला जात आहे. कोलकाता नाईट रायडर्ससाठी आतापर्यंतचा हा मोसम खूप अस्थिर ठरला आहे. कोलकाता नाईट रायडर्सने 11 सामने खेळून 5 जिंकले आहेत तर 6 सामन्यात त्यांना पराभवाचा सामना करावा लागला आहे. दुसरीकडे, या मोसमात राजस्थान रॉयल्सने पहिल्या 5 पैकी 4 सामने जिंकत शानदार सुरुवात केली. यानंतर संघाच्या कामगिरीत घसरण झाली आणि गेल्या 6 पैकी 5 सामन्यात त्यांना पराभवाचा सामना करावा लागला आहे. या सामन्यात दोन्ही संघांमध्ये चुरशीची लढत होणार आहे. दरम्यान, राजस्थान रॉयल्सचा कर्णधार संजू सॅमसनने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. प्रथम फंलदाजी करताना कोलकाता संघाला दुसरा धक्का बसला आहे. कोलकाता स्कोर 34/2

(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)

(The above story first appeared on LatestLY on May 11, 2023 07:57 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).