KKR Beat RCB IPL 2024 10th Match: कोलकाताने बेंगळुरूमध्ये आपला विजयी विक्रम ठेवला कायम, अय्यरच्या संघाने आरसीबीचा सात गडी राखून केला पराभव

या सामन्यात कोलकाताने आरसीबीचा 7 गडी राखून पराभव केला. तत्तपुर्वी, कोलकाता नाईट रायडर्सने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. प्रथम फलंदाजी करताना आरसीबीने केकेआरसमोर 183 धावांचे लक्ष्य ठेवले होते.

KKR Beat RCB IPL 2024 10th Match: कोलकाताने बेंगळुरूमध्ये आपला विजयी विक्रम ठेवला कायम, अय्यरच्या संघाने आरसीबीचा सात गडी राखून केला पराभव

RCB vs KKR, IPL 2024 10th Match: आयपीएल 2024 चा 10 वा सामना शुक्रवारी रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरू विरुद्ध कोलकाता नाइट रायडर्स (RCB vs KKR) यांच्यात एम. चिन्नास्वामी स्टेडियम, बेंगळुरू येथे खेळवला गेला. या सामन्यात कोलकाताने आरसीबीचा 7 गडी राखून पराभव केला. तत्तपुर्वी, कोलकाता नाईट रायडर्सने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. प्रथम फलंदाजी करताना आरसीबीने केकेआरसमोर 183 धावांचे लक्ष्य ठेवले होते. आरसीबीकडून विराट कोहलीने नाबाद 83 धावा केल्या. कोलकाता नाईट रायडर्सकडून आंद्रे रसेल आणि हर्षित राणा यांनी सर्वाधिक विकेट घेतल्या. लक्ष्याचा पाठलाग करण्यासाठी आलेल्या कोलकाता नाईट रायडर्स संघाने 16.5 षटकांत तीन गडी गमावून लक्ष्य गाठले. कोलकाता नाईट रायडर्सकडून स्टार फलंदाज व्यंकटेश अय्यरने सर्वाधिक 50 धावांची खेळी खेळली. रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूकडून यश दयाल, मयंक डागर आणि विजयकुमार वैश यांनी प्रत्येकी एक विकेट घेतली.

(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)

(The above story first appeared on LatestLY on Mar 29, 2024 10:52 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).