SRH vs KKR, IPL 2023 Toss Update: कोलकाता नाईट रायडर्सने हैदराबादविरुद्ध नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा घेतला निर्णय, पहा दोन्ही संघाची प्लेइंग 11
दोन्ही संघांमधील हा सामना हैदराबादच्या राजीव गांधी आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमवर खेळला जात आहे. या मोसमात, येथे 200+ स्कोअर देखील बनविला गेला आहे आणि 144 च्या स्कोअरचा बचाव देखील केला गेला आहे.
इंडियन प्रीमियर लीगच्या 16 व्या मोसमातील 47 वा सामना आज सनरायझर्स हैदराबाद आणि कोलकाता नाईट रायडर्स (SRH vs KKR) यांच्यात खेळला जात आहे. दोन्ही संघांमधील हा सामना हैदराबादच्या राजीव गांधी आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमवर खेळला जात आहे. या मोसमात, येथे 200+ स्कोअर देखील बनविला गेला आहे आणि 144 च्या स्कोअरचा बचाव देखील केला गेला आहे. अशा स्थितीत आजच्या सामन्यात खेळपट्टीच्या मूडमध्ये अनिश्चितता असेल, पण वेगवान गोलंदाजांना या खेळपट्टीतून चांगली मदत मिळू शकते. या मोसमाच्या सुरुवातीला हे दोन्ही संघ आमनेसामने असताना सनरायझर्स हैदराबादने बाजी मारली होती. या सामन्यात दोन्ही संघांमध्ये चुरशीची लढत होणार आहे. दरम्यान, कोलकाता नाईट रायडर्सचा कर्णधार नितीश राणाने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे.
पहा दोन्ही संघाची प्लेइंग 11
सनरायझर्स हैदराबाद : मयंक अग्रवाल, अभिषेक शर्मा, एडन मार्कराम (कर्णधार), हेनरिक क्लासेन (विकेटकीपर), हॅरी ब्रूक, अब्दुल समद, मार्को जॅनसेन, मयंक मार्कंडे, भुवनेश्वर कुमार, कार्तिक त्यागी, टी नटराजन.
कोलकाता नाइट रायडर्स : रहमानउल्ला गुरबाज (विकेटकीपर), जेसन रॉय, व्यंकटेश अय्यर, नितीश राणा (कर्णधार), आंद्रे रसेल, रिंकू सिंग, सुनील नरेन, शार्दुल ठाकूर, वैभव अरोरा, हर्षित राणा, वरुण चक्रवर्ती.
Match 47. Kolkata Knight Riders won the toss and elected to bat. https://t.co/xYKXAE6NDg #TATAIPL #SRHvKKR #IPL2023
— IndianPremierLeague (@IPL) May 4, 2023
(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)
(The above story first appeared on LatestLY on May 04, 2023 07:07 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).

