KL Rahul Walking Away from Sanjiv Goenka: आयपीएल 2025 (Indian Premier League 2025) च्या सामन्यानंतर दिल्ली कॅपिटल्सचा स्टार यष्टीरक्षक-फलंदाज केएल राहुल (KL Rahul) लखनौ सुपर जायंट्सचे मालक संजीव गोयंका यांच्यासोबत हात मिळवताना दिसला. गोयंका यांनी त्याच्याशी बोलण्याचा प्रयत्न केला. परंतू केएल राहुल अंतर ठेवून वेगाने दूर जाताना दिसला. हे दृश्य सामन्यानंतरचे आहे. जेव्हा दिल्ली कॅपिटल्सने लखनौ सुपर जायंट्सचा आठ विकेट्सने पराभव केला. केएल राहुलने त्याच्या माजी संघाविरुद्ध 42 चेंडूत 57 धावांची सामना जिंकणारी खेळी खेळली आणि संघाला 160 धावांचे लक्ष्य सहज पार करण्यात महत्त्वाची भूमिका बजावली. मात्र, व्हायरल व्हिडिओमध्ये, संजीव गोयंका आणि केएल राहूल यांच्यात गोष्टी अजूनही बदलेल्या नाहीत असं दिसतयं.
केएल राहुल एलएसजीचे मालक संजीव गोयंका यांच्यापासून दूर जाताना
Rahul walking away from goenka 🤣🤣😂#klrahul #goenka #ipl #LSGvsDC pic.twitter.com/Wke8kOyoHf
— SarpanchSaab (@kitts1727) April 22, 2025
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)