MI vs GT: 'किसी का भाई किसी की जान, अर्जुन तेंडुलकरने शुभमन गिलला गोलंदाजी केल्याने चाहत्यांनी सोशल मीडियावर दिल्या प्रतिक्रिया

दरम्यान आजच्या सामन्याची चाहते आतुरतने वाट पाहत होते.

इंडियन प्रीमियर लीग 2023 (IPL 2023) मध्ये मंगळवारी गुजरात टायटन्स आणि मुंबई इंडियन्स (MI vs GT) यांच्यात सामना होत आहे. मुंबई इंडियन्सचा कर्णधार रोहित शर्माने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. दरम्यान आजच्या सामन्याची चाहते आतुरतने वाट पाहत होते. कारण, शुभमन गिल (Shubman Gill) अर्जुनची बहीण सारा तेंडुलकरला (Sara Tendulkar) बऱ्याच दिवसांपासून डेट करत आहे आणि त्यामुळे चाहत्यांनी या लढतीला खतपाणी घातले आहे. सोशल मीडियावर चाहत्यांनी लिहिले की, 'किसी का भाई किसी की जान' अर्जुन तेंडुलकरने GT vs MI स्पर्धेत शुभमन गिलला गोलंदीजी केली त्यानंतर चाहत्यांनी जबरदस्त प्रतिक्रिया दिल्या आहे.

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)