IND vs BAN टेस्ट सीरीज दरम्यान Jasprit Bumrah चा पराक्रम; आयसीसी टेस्ट गोलंदाजांच्या रँकिंगमध्ये दुसऱ्या स्थानी झेप

टीम इंडियाचा स्टार गोलंदाज जसप्रीत बुमराह याने आयसीसी टेस्ट गोलंदाजांच्या रँकिंगमध्ये दुसऱ्या स्थानी झेप घेतली आहे.

Jasprit Bumrah (Photo Credit - X)

Jasprit Bumrah: आयसीसीची रँकिंग जाहीर झाली आहे. टीम इंडियाचा स्टार गोलंदाज जसप्रीत बुमराह याने आयसीसी टेस्ट गोलंदाजांच्या रँकिंगमध्ये दुसऱ्या स्थानी झेप घेतली आहे. जोश हेझलवूड याची रँकिंग घसरल्याने बुमराह दुसऱ्या स्थानी कायम राहिला. आयसीसी रँकिंगमध्ये तिसऱ्या स्थानी जोश हेझलवूड असून चौथ्या स्थानी ऑस्ट्रेलियाचाच पॅट कमिन्स आहे. (हेही वाचा:ICC Test Ranking: आयसीसी क्रमवारीत मोठी उलथापालथ, रोहित शर्मा आणि विराट कोहलीचे मोठे नुकसान; जैस्वालची 'यशस्वी' झेप)

जसप्रीत बुमराह याच्या शिवाय रवींद्र जडेजाने आयसीसी रँकिंगमध्ये प्रत्येकी एका स्थानावर प्रगती केली आहे. जडेजाने सातव्या स्थानावरून सहाव्या स्थानी झेप घेतलीये. टीम इंडियाचा स्टार फिरकीपटू रविचंद्रन अश्विन (R Ashwin) याने अव्वल स्थान कायम राखलं आहे. त्याच्याकडे 871 रेटिंग्स आहेत. दरम्यान, टीम इंडियाच्या कुलदीप यादव याला देखील मोठा झटका बसलाय. कुलदीपची एका स्थानाने घसरण झालीये.

आयसीसी टेस्ट गोलंदाजांच्या रँकिंगमध्ये दुसऱ्या स्थानी झेप

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)