IPL Mega Auction: शिवम दुबेला काही तासांत दुहेरी आनंद, बाप बनल्यानंतर आयपीएल लिलावात मिळाला कोट्यवधीचा भाव

भारताचा अष्टपैलू खेळाडू शिवम दुबेसाठी आजचा पूर्ण दिवस आनंदाने भरलेला राहिला. सकाळी त्याच्या घरी पाळणा हलला, तर काही तासांनंतर त्याच्यावर आयपीएलमध्ये नोटांचा पाऊस पडला आहे. आयपीएल लिलावात मुंबईच्या या खेळाडूला एमएस धोनीच्या नेतृत्वातील चेन्नई सुपर किंग्जने 4 कोटी रुपये खर्चून आपल्या संघात समाविष्ट केले आहे.

शिवम दुबे (Photo Credits: Twitter/Shivam Dube)

भारताचा अष्टपैलू खेळाडू शिवम दुबेसाठी Shivam Dube) आजचा पूर्ण दिवस आनंदाने भरलेला राहिला. सकाळी त्याच्या घरी पाळणा हलला, तर काही तासांनंतर आयपीएल लिलावात (IPL Auction) मुंबईच्या या खेळाडूला एमएस धोनीच्या नेतृत्वातील चेन्नई सुपर किंग्जने (Chennai Super Kings) 4 कोटी रुपये खर्चून आपल्या संघात समाविष्ट केले आहे. शिवमचा आयपीएलमधला हा तिसरा संघ आहे. दुबे यापूर्वी रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर आणि राजस्थान रॉयल्स संघाकडून खेळला आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by shivam dube (@dubeshivam)

Share Now
Advertisement


Advertisement
Share Now
Advertisement