IPL 2025 Revised Schedule: आयपीएल चे सामने 17 मे पासून पुन्हा रंगणार; 3 जूनला अंतिम सामना; इथे पहा नवं वेळापत्रक
आयपीएल चे उर्वरित 17 सामने 6 विविध ठिकाणी खेळवले जाणार असल्याची माहिती आज बीसीसीआय ने दिली आहे.
भारत पाक तणावाच्या पार्श्वभूमीवर स्थगित करण्यात आलेले आयपीएल चे सामने आता पुन्हा सुरू होणार आहेत. BCCI ने अधिकृतपणे त्याची घोषणा केली आहे.आयपीएल 2025 मधील उर्वरित सामने 17 मे पासून पुन्हा सुरू होणार आहेत. सरकारशी बोलल्यानंतर, त्यांनी उर्वरित स्पर्धा सुरू ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. 6 वेगवेगळ्या ठिकाणी 17 सामने खेळवले जातील आणि अंतिम सामना 3 जून रोजी होईल. वेळापत्रकात रविवारी दोन डबल-हेडर देखील आहेत आणि प्लेऑफ 29 मे पासून सुरू होतील.
आयपीएल 2025 चं नवं वेळापत्रक
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)