IPL 2024: आयपीएल 2024 पूर्वी मुंबई इंडियन्सने रोहित शर्माला कर्णधारपदावरून हटवून हार्दिक पांड्याला संघाचा नवा कर्णधार बनवले होते. यानंतर आता रोहित शर्माची पत्नी रितिका सजदेह मुंबई इंडियन्सचे प्रशिक्षक मार्क बाउचरवर चिडताना दिसली. रोहित शर्माला मुंबई इंडियन्सच्या कर्णधारपदावरून हटवण्याच्या निर्णयामुळे रितिका चांगलीच संतापली आहे. खरं तर, एका मुलाखतीदरम्यान मार्क बाउचर म्हणाला होता की, कर्णधार बदलाचा निर्णय पूर्णपणे 'क्रिकेटिंग' निर्णय असल्याचे वर्णन केले. पण रोहितची पत्नी रितिका सजदेह नाखूश होती आणि तिने व्हिडिओवर प्रतिक्रिया दिली की, "यामध्ये बरेच काही चुकीचे झाले आहे." तिच्या या प्रतिसादाला काही चाहत्यांचाही पाठिंबा मिळाला. तुम्ही खालील व्हिडिओ पाहू शकता.
Mark Boucher cmnt on Captaincy of MI and about Rohit Sharma and Hardik Pandya , on that video Ritika cmntd this .#MumbaiIndians | #RohitSharma#Ritika pic.twitter.com/hLykWL92Kd pic.twitter.com/DrW2bCNMbJ
— Savage Uncle 🥸 (@Savage_Uncle2) February 6, 2024
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)