IPL 2024: सनरायझर्स हैदराबादविरुद्धच्या पराभवानंतर LSG चे मालक Sanjiv Goenka संतापले; ऑन कॅमेरा कर्णधार KL Rahul ला सुनावले खडे बोल (Watch Shocking Video)

लखनौ सुपर जायंट्स लाजिरवाण्या पराभवानंतर, एलएसजीचे मालक भारतीय अब्जाधीश संजीव गोयंका आणि कर्णधार केएल राहुल यांच्यातील संभाषणाचा व्हिडिओ व्हायरल होत आहे.

Sanjiv Goenka Intense Conversation With KL Rahul

IPL 2024: आयपीएल 2024 मधील 57 वा सामना बुधवारी सनरायझर्स हैदराबाद आणि लखनऊ सुपर जायंट्स (LSG) यांच्यात खेळला गेला, ज्यामध्ये लखनऊ सुपर जायंट्सचा पराभव झाला. हैदराबादच्या राजीव गांधी इंटरनॅशनल स्टेडियमवर खेळल्या गेलेल्या या सामन्यात एसआरएचने 10 गडी राखून मोठा विजय मिळवला. लखनौ सुपर जायंट्स लाजिरवाण्या पराभवानंतर, एलएसजीचे मालक भारतीय अब्जाधीश संजीव गोयंका आणि कर्णधार केएल राहुल यांच्यातील संभाषणाचा व्हिडिओ व्हायरल होत आहे. व्हिडिओमध्ये संजीव संघाचा कर्णधार केएल राहुलला फटकारताना दिसत आहेत. व्हिडिओमध्ये संभाषणाचा ऑडिओ ऐकू येत नाही, मात्र गोयंका यांच्या हावभावावरून हे स्पष्ट दिसत आहे की, ते संघाच्या कामगिरीवर चिडले आहेत. गोयंका अतिशय तावातावाने बोलत आहेत आणि संघाचा कर्णधार असलेला केएल राहुल त्यांच्यासमोर असहाय्य उभा आहे. सध्या हा व्हिडिओ सोशल मिडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. (हेही वाचा: SRH New Record IPL 2024: हैदराबादने रचला इतिहास, 10 गडी राखून सामना जिंकून अनेक विक्रम केले नावावर; मुंबई आयपीएल 2024 मधून बाहेर)

पहा व्हिडिओ-

 

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)