IPL 2024: गुजरात टायटन्ससाठी वाईट बातमी, दुचाकी अपघातामुळे हा खेळाडू लीगबाहेर!

गुजरात टायटन्स 24 मार्च रोजी अहमदाबादमध्ये मुंबई इंडियन्सविरुद्ध आपल्या मोहिमेची सुरुवात करणार आहे. मात्र या सामन्यापूर्वी गुजरात टायटन्सला मोठा धक्का बसला आहे. नुकताच युवा खेळाडू रॉबिन मिन्झ जखमी झाला.

गुजरात टायटन्स (Photo Credit: PTI)

22 मार्चपासून आयपीएल 2024 सुरू होत आहे. पहिल्या सामन्यात गतविजेत्या चेन्नई सुपर किंग्जचा सामना चेपॉकवर रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूशी होणार आहे. दरम्यान, गुजरात टायटन्स 24 मार्च रोजी अहमदाबादमध्ये मुंबई इंडियन्सविरुद्ध आपल्या मोहिमेची सुरुवात करणार आहे. मात्र या सामन्यापूर्वी गुजरात टायटन्सला मोठा धक्का बसला आहे. नुकताच युवा खेळाडू रॉबिन मिन्झ जखमी झाला. रॉबिन मिन्झ यांचा बाईक अपघात झाला. त्यामुळे या खेळाडूला उजव्या गुडघ्याला थोडी दुखापत झाली. 21 वर्षांचा रॉबिन मिन्झ कावासाकी सुपरबाईक चालवत होता आणि समोरून येणाऱ्या बाईकची धडक इतकी भीषण होती की त्याच्या बाईकचा पुढचा भाग खराब झाला. गुजरात टायटन्सने आयपीएल 2024 च्या लिलावात रॉबिन मिंजला 3.60 कोटी रुपयांना विकत घेतले. पण आता रॉबिन मिंज दुखापतीमुळे संपूर्ण आयपीएल हंगामाला मुकणार असल्याची बातमी समोर येत आहे.

Share Now
Advertisement


Advertisement
Share Now
Advertisement