IPL 2022: ‘अच्छा चलता हूं, दुआओं में याद रखना’, आयपीएल लिलावापूर्वी Wasim Jaffer यांचा पंजाब किंग्सच्या फलंदाजी प्रशिक्षक पदाचा राजीनामा
इंडियन प्रीमियर लीग (IPL) 2022 मेगा लिलावाच्या पूर्वसंध्येला भारताचा माजी सलामीवीर वसीम जाफरने पंजाब किंग्जचे फलंदाजी प्रशिक्षक पदाचा राजीनामा दिल्याची घोषणा केली. जाफर 2019 मध्ये तत्कालीन पंजाबमध्ये सामील झाले आणि 2021 हंगामापर्यंत सपोर्ट स्टाफसोबत काम केले. जाफरने पंजाब फ्रँचायझीचे आभार मानले आणि त्यांचे मुख्य प्रशिक्षक अनिल कुंबळे यांना आगामी हंगामासाठी शुभेच्छा दिल्या.
IPL 2022: भारताचा माजी सलामीवीर वसीम जाफरने (Wasim Jaffer) पंजाब किंग्ज (Punjab Kings) फ्रँचायझीमधून बाहेर पडण्याची घोषणा एका अनोख्या आणि आनंदी पद्धतीने केली. जाफरने आयपीएल (IPL) 2022 मेगा लिलावाच्या पूर्वसंध्येला PBKS चे फलंदाजी प्रशिक्षक पद सोडल्याची घोषणा केली.
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)