IPL 2022: मुंबई इंडियनच्या तोडफोड मंडळचा नवीन सदस्य हॉटेलमध्ये दाखल, किरोन पोलार्ड सोबत करणार जोरदार फटकेबाजी (Watch Video)
ऑस्ट्रेलियन-सिंगापूरचा फलंदाज टिम डेव्हिड आयपीएल 2022 आवृत्तीपूर्वी मुंबई इंडियन्सच्या टीम हॉटेलमध्ये दाखल झाला आहे. फारसा आंतरराष्ट्रीय अनुभव नसतानाही, डेव्हिडने काही फ्रँचायझींसाठी त्याच्या कामगिरीमुळे पॉवर हिटर म्हणून स्वतःची ओळख निर्माण केली आहे. मुंबई इंडियन्सने या खेळाडूसाठी 8.25 कोटी रुपये खर्च केले.
IPL 2022: आयपीएल (IPL) मेगा लिलावात कोट्यवधी रुपयांत खरेदी केलेला सिंगापूरचा अष्टपैलू खेळाडू टिम डेविड (Tim David) मुंबईत पोहोचला आहे. त्याचे स्वागत करण्यासाठी मुंबई इंडियन्स (Mumbai Indians) कडून एक खास पोस्ट करण्यात आली.टी-20 क्रिकेटचा धडाकेबाज फलंदाज मुंबईच्या तोडफोड मंडळचा नवीन सदस्य असून तो संघासाठी मधल्या फळीत किरोन पोलार्ड (Kieron Pollard) सह फटकेबाजी करताना दिसणार आहे.
🇸🇬 ✈️ ➡️ 🇮🇳 🏚️
Our newest member of the तोडफोड मंडळ, Tim David is home! 💥💙#OneFamily #MumbaiIndians @timdavid8 MI TV pic.twitter.com/Fo9DygMFgM
— Mumbai Indians (@mipaltan) March 10, 2022
(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)
(The above story first appeared on LatestLY on Mar 11, 2022 10:07 AM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).

