IPL 2022, MI vs DC: दिल्लीचे मुंबईसमोर 160 धावांचे आव्हान, पंत-पॉवेलने राखली लाज; जसप्रीत बुमराहला सर्वाधिक विकेट्स
IPL 2022, MI vs DC: दिल्ली कॅपिटल्सने पहिले फलंदाजी करून निर्धारित 20 ओव्हरमध्ये 7 बाद 159 धावा केल्या आणि मुंबई इंडियन्सपुढे विजयासाठी 160 धावांचे आव्हान ठेवले आहे. दिल्लीकडून रोवमन पॉवेलने सर्वाधिक 43 धावा केल्या. तर कर्णधार ऋषभ पंतने 39धावांचे योगदान दिले. दुसरीकडे, मुंबईसाठी जसप्रीत बुमराहने सर्वाधिक तीन विकेट्स घेतल्या.
IPL 2022, MI vs DC Match 69: दिल्ली कॅपिटल्सने (Delhi Capitals) पहिले फलंदाजी करून निर्धारित 20 ओव्हरमध्ये 7 बाद 159 धावा केल्या आणि मुंबई इंडियन्सपुढे (Mumbai Indians) विजयासाठी 160 धावांचे आव्हान ठेवले आहे. प्ले ऑफमध्ये प्रवेश मिळवण्यासाठी दिल्लीला आजचा सामना जिंकणे अनिवार्य आहे. दिल्लीकडून रोवमन पॉवेलने (Rovman Powell) सर्वाधिक 43 धावा केल्या. तर कर्णधार ऋषभ पंतने (Rishabh Pant) 39 आणि पृथ्वी शॉने 24 धावांचे योगदान दिले. दुसरीकडे, तीन विकेट्स घेत जसप्रीत बुमराह (Jasprit Bumrah) मुंबईचा यशस्वी गोलंदाज ठरला. रमणदीप सिंहने 2, डॅनियल सॅम्स आणि मयंक मार्कंडेने प्रत्येकी 1-1 गडी बाद केले.
1⃣6⃣0⃣ to chase 💪
काय वाटतय पलटन 👇
— Mumbai Indians (@mipaltan) May 21, 2022
(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)
(The above story first appeared on LatestLY on May 21, 2022 09:24 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).

