IPL 2022, DC vs RR Match 34: जोस बटलरचे झंझावाती शतक, पडिक्क्लच्या अर्धशतकी खेळीने राजस्थानचा 222 धावांचा डोंगर; दिल्लीच्या गोलंदाजांची दैना

IPL 2022, DC vs RR Match 34: जोस बटलर याचे ताबडतोड शतक आणि देवदत्त पडिक्क्लच्या तुफान अर्धशतकीच्या खेळीच्या बळावर राजस्थान रॉयल्स संघाने निर्धारित 20 ओव्हर्समध्ये 2 विकेट गमावून 222 धावांचा डोंगर उभारला आहे. अशाप्रकारे दिल्ली कॅपिटल्स संघाला विजयासाठी 223 धावांचे तगडे आव्हान मिळाले आहे. बटलरने 65 चेंडूत 116 धावांची झंझावाती खेळी केली तर पडिक्क्लने 54 धावा केल्या.

IPL 2022, DC vs RR Match 34: जोस बटलरचे झंझावाती  शतक, पडिक्क्लच्या अर्धशतकी खेळीने राजस्थानचा 222 धावांचा डोंगर; दिल्लीच्या गोलंदाजांची दैना
जोस बटलर (Photo Credit: PTI)

IPL 2022, DC vs RR Match 34: जोस बटलर (Jos Buttler) याचे ताबडतोड शतक आणि देवदत्त पडिक्क्लच्या (Devdutt Padikkal) तुफान अर्धशतकीच्या खेळीच्या बळावर राजस्थान रॉयल्स (Rajasthan Royals) संघाने निर्धारित 20 ओव्हर्समध्ये 2 विकेट गमावून 222 धावांचा डोंगर उभारला आहे. अशाप्रकारे दिल्ली कॅपिटल्स (Delhi Capitals) संघाला विजयासाठी 223 धावांचे तगडे आव्हान मिळाले आहे. बटलरने 65 चेंडूत 116 धावांची झंझावाती खेळी केली तर पडिक्क्लने 54 धावा केल्या. तसेच कर्णधार संजू सॅमसन धावा आणि शिमरॉन हेटमायर धावा करून नाबाद परतला. दुसरीकडे, दिल्लीकडून खालील अहमद आणि मुस्ताफिजूर रहमान यांनी प्रत्येकी एक-एक विकेट घेतली.

(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)

(The above story first appeared on LatestLY on Apr 22, 2022 09:26 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).