IPL 2022, DC vs RCB Match 27: दिनेश कार्तिकने केला कहर, बेंगलोरचे दिल्लीसमोर 190 धावांचे तगडे आव्हान
IPL 2022, DC vs RCB: दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध आयपीएलच्या 27 व्या सामन्यात दिनेश कार्तिक याच्या झंझावती अर्धशतकी खेळीने रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर संघाला निर्धारित षटकांत पाच बाद धावांपर्यंत मजल मारून दिली. अशाप्रकारे वानखेडे स्टेडियमवर दिल्लीला विजयासाठी धावांचे तगडे आव्हान मिळाले आहे. कार्तिकने नाबाद 66 धावांची तुफानी खेळी केली. तर शाहबाद अहमद 32 धावा करून नाबाद परतला.
IPL 2022, DC vs RCB: दिल्ली कॅपिटल्स (Delhi Capitals) विरुद्धच्या आयपीएलच्या (IPLP) 27 व्या सामन्यात दिनेश कार्तिक (Dinesh Karthik) याच्या झंझावती अर्धशतकी खेळीने रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर (Royal Challengers Bangalore) संघाला निर्धारित 20 षटकांत पाच बाद 189 धावांपर्यंत मजल मारून दिली. अशाप्रकारे वानखेडे स्टेडियमवर दिल्लीला विजयासाठी 190 धावांचे तगडे आव्हान मिळाले आहे. कार्तिकने नाबाद 66 धावांची तुफानी खेळी केली. तर ग्लेन मॅक्सवेलने (Glenn Maxwell) 55 धावा केल्या आणि शाहबाद अहमद 32 धावा करून नाबाद परतला. कार्तिकने आपल्या खेळीत 5 चौकार आणि तितकेच षटकार खेचले. दुसरीकडे, दिल्लीकडून शार्दूल ठाकूर, खालील अहमद, अक्षर पटेल आणि कुलदीप यादव यांनी प्रत्येकी एक विकेट घेतली.
Innings Break!@DineshKarthik & @Gmaxi_32 scored stunning half-centuries and Shahbaz Ahmed scored a handy 32* as @RCBTweets posted 189/5 on the board. 👏 👏
The @DelhiCapitals chase to commence shortly. 👍 👍
Scorecard 👉 https://t.co/Kp3DueRxD0#TATAIPL | #DCvRCB pic.twitter.com/qDAmQ48CWT
— IndianPremierLeague (@IPL) April 16, 2022
(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)
(The above story first appeared on LatestLY on Apr 16, 2022 09:26 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).

