IPL 2022, CSK vs DC: दिल्ली कॅपिटल्सचा सलामीवीर Prithvi Shaw रुग्णालयात, सोशल मीडियावर फोटोद्वारे शेअर केली माहिती

IPL 2022, CSK vs DC Match 55: दिल्ली कॅपिटल्सचा युवा सलामीवीर पृथ्वी शॉ याला ताप आल्याने रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. तापाचे कारण मात्र कळू शकलेले नसून आज दिवसाच्या सुरुवातीला फ्रँचायझीच्या एका नेट गोलंदाजाची COVID-19 चाचणी सकारात्मक आल्यानंतर दिल्ली कॅपिटल्सच्या खेळाडूंना आयसोलेट करण्यात आले आहे.

IPL 2022, CSK vs DC: दिल्ली कॅपिटल्सचा सलामीवीर Prithvi Shaw रुग्णालयात, सोशल मीडियावर फोटोद्वारे शेअर केली माहिती
पृथ्वी शॉ (Photo Credit: Twitter/DelhiCapitals)

IPL 2022 चा 55 वा सामना चेन्नई सुपर किंग्ज (Chennai Super Kings) आणि दिल्ली कॅपिटल्स (Delhi Capitals) यांच्यात 8 मे रोजी खेळला जाणार आहे. या सामन्यातही दिल्ली कॅपिटल्सचा सलामीवीर पृथ्वी शॉ (Prithvi Shaw) संघाच्या प्लेइंग इलेव्हनमध्ये दिसणार नाही. दिल्लीचा फलंदाज पृथ्वीला सनरायझर्स हैदराबादविरुद्धच्या शेवटच्या सामन्यापासून खूप ताप आला होता, त्यामुळे तो शेवटचा सामना खेळू शकला नाही. आणि आज सोशल मीडियावर एक पोस्ट टाकून त्याने लवकरच तापातून बरा होऊन मैदानात परतणार असल्याची माहिती दिली.

पृथ्वी शॉ रुग्णालयात दाखल (Photo Credit: Instagram)

(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)

(The above story first appeared on LatestLY on May 08, 2022 05:35 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).