IPL 2021: वाढदिवशी अर्जुन तेंडुलकरच्या हॉटेलच्या खोलीवर मुंबईच्या ‘या’ खेळाडूने मारला ‘छापा’, लॉकरमध्ये सापडल्या चकित करणाऱ्या वस्तू
सचिन तेंडुलकरचा मुलगा अर्जुन तेंडुलकरने 24 सप्टेंबर रोजी आपला 22 वा वाढदिवस साजरा केला. या विशेष प्रसंगी, त्याच्या आयपीएल टीम मुंबई इंडियन्सचा सहकारी आदित्य तरेने त्याच्या हॉटेलच्या खोलीत सरप्राईज एंट्री घेतली. मुंबईने इन्स्टाग्राम अकाऊंटवर एक व्हिडिओ शेअर केला, “आमच्या बर्थडे बॉयच्या खोलीवर छापा. आदित्य तरेने त्याचा सहकारी साथीदार अर्जुन तेंडुलकरच्या खोलीला अचानक भेट दिली.”
सचिन तेंडुलकरचा मुलगा अर्जुन तेंडुलकरने (Arjun Tendulkar) 24 सप्टेंबर रोजी आपला 22 वा वाढदिवस साजरा केला. या विशेष प्रसंगी, त्याच्या आयपीएल (IPL) टीम मुंबई इंडियन्सचा (Mumbai Indians) सहकारी आदित्य तरेने (Aditya Tare) त्याच्या हॉटेलच्या खोलीत सरप्राईज एंट्री घेतली. अर्जुनच्या हॉटेलच्या खोलीची झलक या व्हिडिओमध्ये दाखवण्यात आली. अर्जुनने त्याचे लॉकर उघडून दाखवले ज्यामध्ये पासपोर्ट व्यतिरिक्त, मसाला ओट्स, अंडी, भाज्या आणि मसाला शेंगदाणे सापडले.
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)