IND vs SL 3rd T20: भारताने नाणेफेक जिंकुन घेतला फंलदांजी करण्याचा निर्णय, पहा दोन्हा संघाची प्लेइंग इलेव्हन

राजकोटच्या सौराष्ट्र क्रिकेट असोसिएशन स्टेडियमवर हा सामना खेळवण्यात येत आहे.

IND vs SL (Photo Credit - Twitter)

IND vs SL 3rd T20: आज टीम इंडिया आणि श्रीलंका यांच्यातील तिसरा आणि शेवटचा टी-20 सामना थोड्याच वेळात सुरू होणार आहे. राजकोटच्या सौराष्ट्र क्रिकेट असोसिएशन स्टेडियमवर हार्दिक पांड्याच्या नेतृत्वाखालील टीम इंडिया आणि दासून शनाकाच्या नेतृत्वाखालील श्रीलंका एकमेकांशी भिडणार आहेत. या दरम्यान भारताने नाणेफेक जिंकुन फंलदांजी करण्याचा निर्णय घेतला आहे.

प्लेइंग इलेव्हनवर एक नजर:

भारताचा प्लेइंग इलेव्हन: इशान किशन (यष्टीरक्षक), शुभमन गिल, सूर्यकुमार यादव, राहुल त्रिपाठी, हार्दिक पंड्या (कर्णधार), दीपक हुडा, अक्षर पटेल, शिवम मावी, उमरान मलिक, अर्शदीप सिंग, युझवेंद्र चहल.

श्रीलंका प्लेइंग इलेव्हन: पथुम निसांका, कुसल मेंडिस (यष्टीरक्षक), अविष्का फर्नांडो, धनंजया डी सिल्वा, चरित अस्लंका, दासुन शानाका (कर्णधार), वानिंदू हसरंगा, चमका करुणारत्ने, महेश थिक्शाना, कसून राजिथा, दिलशान मदुशंका.

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)



संबंधित बातम्या