IND W vs AUS W 1st ODI Live Score Update: भारताने ऑस्ट्रेलियासमोर ठेवले 283 धावांचे लक्ष्य; जेमिमा आणि वस्त्राकरने कागांरुना धुतले

भारतीय कर्णधार हरमनप्रीत कौरने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. टीम इंडियाने ऑस्ट्रेलियासमोर 283 धावांचे लक्ष्य ठेवले आहे. भारताने निर्धारित 50 षटकात आठ गडी गमावून 282 धावा केल्या. भारताकडून जेमिमाह रॉड्रिग्जने सर्वाधिक 82 धावा केल्या.

IND W vs AUS W 1st ODI: भारत आणि ऑस्ट्रेलिया (IND vs AUS) यांच्यातील तीन एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेतील पहिला सामना आज मुंबईतील वानखेडे स्टेडियमवर खेळवला जात आहे. भारतीय कर्णधार हरमनप्रीत कौरने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. टीम इंडियाने ऑस्ट्रेलियासमोर 283 धावांचे लक्ष्य ठेवले आहे. भारताने निर्धारित 50 षटकात आठ गडी गमावून 282 धावा केल्या. भारताकडून जेमिमाह रॉड्रिग्जने सर्वाधिक 82 धावा केल्या. पूजा वस्त्राकरने नाबाद 62 धावांचे योगदान दिले. ऑस्ट्रेलियाकडून ऍशले गार्डनर आणि जॉर्जिया वेअरहॅमने प्रत्येकी दोन गडी बाद केले. डार्सी ब्राउन, अॅनाबेल सदरलँड, मेगन शुट आणि अलाना किंग यांनी प्रत्येकी एक विकेट घेतली. (हे देखील वाचा: Year End 2023: यावर्षी अनेक क्रिकेटपटूंनी घेतला जगाचा निरोप, चाहत्यांनी बिशन सिंग बेदीसह अनेक दिग्गजांना गमावले)

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement