IND vs SL 3rd T20 Live Update: भारताने श्रीलंकेला दिले 229 धावांचे लक्ष्य, सूर्यकुमारने 51 चेंडूत केल्या 112 धावा

टीम इंडियाचा कर्णधार हार्दिक पंड्याने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. प्रथम फलंदाजी करताना टीम इंडियाने 20 षटकात 5 गडी गमावून 228 धावा केल्या.

Surya Kumar Yadav (Photo Credit - Twitter)

IND vs SL 3rd T20: टीम इंडिया आणि श्रीलंका यांच्यात दुसरा टी-20 सामना खेळला जात आहे. राजकोटमधील सौराष्ट्र क्रिकेट असोसिएशन स्टेडियमवर दोन्ही संघांमध्ये हा सामना खेळला जात आहे. तीन सामन्यांची ही मालिका 1-1 अशी बरोबरीत आहे. टीम इंडियाचा कर्णधार हार्दिक पंड्याने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. प्रथम फलंदाजी करताना टीम इंडियाने 20 षटकात 5 गडी गमावून 228 धावा केल्या. टीम इंडियाचा स्फोटक फलंदाज सूर्यकुमार यादवने धडाकेबाज खेळी खेळताना आपले तिसरे टी-20 शतक पूर्ण केले. सूर्यकुमार यादवने 51 चेंडूत 9 षटकार आणि 7 चौकारांच्या मदतीने 112 धावा केल्या. श्रीलंकेकडून दिलशान मदुशंकाने सर्वाधिक दोन बळी घेतले. हा सामना जिंकण्यासाठी श्रीलंकेला 20 षटकात 229 धावा करायच्या आहेत.

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement