IND vs PAK Champions Trophy 2025: भारत-पाकिस्तान सामन्यापूर्वी प्रयागराजमध्ये पूजा, टीम इंडियाच्या विजयासाठी विशेष आरती करण्यात आली

आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 मधील सर्वात हाय व्होल्टेज सामना आज होत आहे. संपूर्ण देशाचे लक्ष आजच्या सामन्यावर आहेत. कारण, क्रिकेट विश्वातील कट्टर प्रतिस्पर्धी भारतीय संघ आणि पाकिस्तान संघ यांच्यात सामना खेळला जाणार आहे. त्यामुळे देळाच्या काना कोपऱ्यात भारतीय संघ जिंकावा यासाठी पूजा, अर्चणा, हवन केला जात आहे.

Photo Credit- X

India National Cricket Team vs Pakistan National Cricket Team ICC Champions Trophy 2025: आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 (Champions Trophy 2025) मधील सर्वात हाय व्होल्टेज सामना आज म्हणजेच 23 फेब्रुवारी रोजी भारतीय राष्ट्रीय क्रिकेट संघ आणि पाकिस्तान राष्ट्रीय क्रिकेट संघ यांच्यात खेळला जाl आहे. दोन्ही संघांमधील हा सामना दुबई आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियम, दुबई येथे दुपारी 2.30 वाजता खेळला जाईल. चॅम्पियन्स ट्रॉफीचा हा पाचवा सामना असेल. भारत आणि पाकिस्तान तसेच इतर देशांमधील क्रिकेट चाहते या सामन्याबद्दल उत्सुक आहेत. दरम्यान, सामन्यापूर्वी, भारतीय क्रिकेट संघाच्या विजयासाठी प्रयागराजच्या आध्यात्मिक निवासस्थानी पूजा आणि आरती करण्यात आली. ज्याचा व्हिडिओ समोर आला आहे.

भारत-पाकिस्तान सामन्यापूर्वी प्रयागराजमध्ये पूजा 

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)

Share Now

Share Now