IND vs BAN 2nd Test Day 4 Live Update: बांगलादेशविरुद्धच्या दुसऱ्या कसोटीत भारत अडचणीत, पंतसह सहा फलंदाज बाद
दुसऱ्या डावात फलंदाजीसाठी आलेल्या टीम इंडियाला सहावा मोठा धक्का बसला. जयदेव उनाडकट नंतर ऋषभ पंत पण देखील पॅव्हेलियनमध्ये परतला आहे.
IND vs BAN 2nd Test: टीम इंडिया आणि बांगलादेश यांच्यातील 2 कसोटी सामन्यांच्या मालिकेतील दुसरा सामना शेरे बांगला नॅशनल स्टेडियमवर खेळवला जाणार आहे. पहिली कसोटी जिंकून टीम इंडियाने या मालिकेत 1-0 अशी आघाडी घेतली आहे. चौथ्या दिवसाचा खेळ सुरूच आहे. तिसऱ्या दिवसाचा खेळ संपेपर्यंत टीम इंडियाने 4 विकेट गमावून 45 धावा केल्या होत्या. अक्षर पटेल 26 आणि जयदेव उनाडकट 3 धावा करून क्रीजवर उपस्थित आहेत. टीम इंडियाला अजूनही विजयासाठी 89 धावांची गरज आहे. बांगलादेशचा दुसरा डाव अवघ्या 231 धावांवर आटोपला. बांगलादेशकडून लिटन दासने सर्वाधिक 73 धावा केल्या. टीम इंडियाकडून अक्षर पटेलने सर्वाधिक तीन विकेट घेतल्या. दुसऱ्या डावात फलंदाजीसाठी आलेल्या टीम इंडियाला सहावा मोठा धक्का बसला. जयदेव उनाडकट नंतर ऋषभ पंत पण देखील पॅव्हेलियनमध्ये परतला आहे. टीम इंडियाचा स्कोर 71/6 आहे.
2ND Test. WICKET! 27.6: Rishabh Pant 9(13) lbw Mehidy Hasan Miraz, India 71/6 https://t.co/CrrjGfXPgL #BANvIND
— BCCI (@BCCI) December 25, 2022
(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)
(The above story first appeared on LatestLY on Dec 25, 2022 09:32 AM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).

