IND vs SL 1st T20I Live Score Update: भारताला मिळाली सातवी विकेट, वानिंदू हसरंगा दोन धावा करुन बाद

गौतम गंभीर मुख्य प्रशिक्षक झाल्यानंतर टीम इंडियाची ही पहिलीच मालिका आहे. या मालिकेत टीम इंडियाची कमान सूर्यकुमार यादवच्या (SuryaKumar Yadav) हाती आहे. तर चारिथ असलंकाला श्रीलंकेचा कर्णधार बनवण्यात आले आहे.

IND vs SL 1st T20I Live Score Update: भारताला मिळाली सातवी विकेट, वानिंदू हसरंगा दोन धावा करुन बाद
Team India (Photo Credit - X)

IND vs SL 1st T20I: भारत आणि श्रीलंका (IND vs SL T20I Series) यांच्यातील तीन सामन्यांच्या मालिकेतील पहिला टी-20 सामना शनिवारी (27 जुलै) पल्लेकेले आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर खेळवला जात आहे. या सामन्यातून दोन्ही संघांसाठी एका नव्या पर्वाची सुरुवात होत आहे. गौतम गंभीर मुख्य प्रशिक्षक झाल्यानंतर टीम इंडियाची ही पहिलीच मालिका आहे. या मालिकेत टीम इंडियाची कमान सूर्यकुमार यादवच्या (SuryaKumar Yadav) हाती आहे. तर चारिथ असलंकाला श्रीलंकेचा कर्णधार बनवण्यात आले आहे. दरम्यान, श्रीलंकेने टाॅस जिंकून गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. नाणेफेक गमावल्यानंतर प्रथम फलंदाजी करण्यासाठी आलेल्या भारतीय संघाने 20 षटकात 213 धावा केल्या आहे. भारताकडून यशस्वी जैस्वाल 40, सूर्यकुमार यादव 58 आणि ऋषभ पंत 49 सर्वाधिक धावा केल्या आहे. तर श्रीलंकाकडून माथेशा पाथीराणाने सर्वाधिक 4 विकेट घेतल्या आहे. श्रीलंकाला हा सामना जिंकण्यासाठी 20 षटकात 214 धावा करायच्या आहेत. लक्ष्याचा पाठलाग करण्यासाठी आलेल्या श्रीलंकेला सातवा धक्का लागला आहे. श्रीलंकाचा स्कोर 163/7

(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)

(The above story first appeared on LatestLY on Jul 27, 2024 10:31 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).