IND vs ENG T20 WC 2024 Semi-Final 2 Live Score Update: भारताला मिळाली सातवी विकेट, कुलदीपला मिळाली विकेट

नाणेफेक गमावल्यानंतर प्रथम फलंदाजीसाठी आलेल्या भारतीय संघाने 20 षटकात 171 धावा केल्या आहे. भारतीय संघाकडून कर्णधार रोहित शर्माने सर्वाधिक 57 धावा केल्या. दुसरीकडे, इंग्लंडकडून ख्रिस जॉर्डन सर्वाधिक दोन विकेट घेतल्या. इंग्लंडला हा सामना जिंकण्यासाठी 20 षटाकात 172 धावा करायच्या आहेत.

IND vs ENG T20 WC 2024 Semi-Final 2 Live Score Update: भारताला मिळाली सातवी विकेट, कुलदीपला मिळाली विकेट
Team India (Photo Credit - X)

IND vs ENG T20 WC 2024 Semi-Final 2: टी-20 विश्वचषक (T20 World Cup 2024) स्पर्धेतील दुसरा उपांत्य सामना आज भारत आणि इंग्लंड (IND vs ENG) यांच्यात गयानाच्या प्रॉव्हिडन्स स्टेडियमवर खेळवला जात आहे. सुपर-8 च्या महत्त्वाच्या सामन्यात कांगारूंना पराभूत केल्यानंतर आता टीम इंडिया उपांत्य फेरीत ब्रिटीशांशी लढत आहे. याआधी दक्षिण आफ्रिकेच्या संघाने अफगाणिस्तानचा पराभव करुन अंतिम फेरीत प्रवेश केला आहे. म्हणजेच आजचा विजयी संघ 29 जून रोजी अंतिम फेरीत दक्षिण आफ्रिकेशी भिडणार आहे. तत्तपुर्वी, इंग्लंडने टाॅस जिंकून गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. नाणेफेक गमावल्यानंतर प्रथम फलंदाजीसाठी आलेल्या भारतीय संघाने 20 षटकात 171 धावा केल्या आहे. भारतीय संघाकडून कर्णधार रोहित शर्माने सर्वाधिक 57 धावा केल्या. दुसरीकडे, इंग्लंडकडून ख्रिस जॉर्डन सर्वाधिक दोन विकेट घेतल्या. इंग्लंडला हा सामना जिंकण्यासाठी 20 षटाकात 172 धावा करायच्या आहेत. दरम्यान, लक्ष्याचा पाठलाग करण्यासाठी आलेल्या इंग्लंडला सातवा धक्का लागला आहे. इंग्लंडचा स्कोर 69/7

(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)

(The above story first appeared on LatestLY on Jun 28, 2024 01:14 AM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).