IND vs USA T20 WC 2024: टी-20 विश्वचषक 2024 चा 25 वा (T20 World Cup 2024) सामना आज भारतीय राष्ट्रीय क्रिकेट संघ आणि यूएस राष्ट्रीय क्रिकेट संघ (IND vs USA) यांच्यात न्यूयॉर्कमधील नासाऊ काउंटी आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमवर खेळवला जात आहे. टीम इंडिया आणि अमेरिका अ गटातील संघ आहेत. या दोन संघांसह पाकिस्तानचाही अ गटात समावेश आहे. सुरुवातीचे दोन्ही सामने जिंकून टीम इंडिया आणि अमेरिका पॉइंट टेबलमध्ये पहिल्या आणि दुसऱ्या स्थानावर आहेत. दरम्यान, टीम इंडियाचा कर्णधार रोहित शर्माने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. नाणेफेक हरल्यानंतर प्रथम फलंदाजीला आलेल्या अमेरिकन संघाला चौथा मोठा धक्का बसला आहे. अमेरिकेच्या संघाचा स्कोअर 56/4

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)