India Beat Afghanistan: सुपर-8 मध्ये भारताची विजयाने सुरुवात, सूर्या-बुमराह ठरले हिरो; अफगाणिस्तानचा 47 धावांनी केला पराभव

टी-20 विश्वचषकाचा 43 वा सामना (T20 World Cup 2024) आज भारत आणि अफगाणिस्तान (IND vs AFG) यांच्यात केन्सिंग्टन ओव्हल, ब्रिजटाऊन, बार्बाडोस येथे खेळवला गेला. दोन्ही संघांचा सुपर-8 मधील हा तिसरा सामना होता. या सामन्यात भारतीय संघाने अफगाणिस्तानचा 47 धावांनी पराभव केला आहे.

India Beat Afghanistan: सुपर-8 मध्ये भारताची विजयाने सुरुवात, सूर्या-बुमराह ठरले हिरो; अफगाणिस्तानचा 47 धावांनी केला पराभव
Team India (Photo Credit - X)

IND vs AFG T20 WC 2024 Super 8: टी-20 विश्वचषकाचा 43 वा सामना (T20 World Cup 2024) आज भारत आणि अफगाणिस्तान (IND vs AFG) यांच्यात केन्सिंग्टन ओव्हल, ब्रिजटाऊन, बार्बाडोस येथे खेळवला गेला. दोन्ही संघांचा सुपर-8 मधील हा तिसरा सामना होता. या सामन्यात भारतीय संघाने अफगाणिस्तानचा 47 धावांनी पराभव केला आहे. तत्तपुर्वी, टीम इंडियाचा कर्णधार रोहित शर्माने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. प्रथम फलंदाजीसाठी आलेल्या भारतीय संघाने अफगाणिस्तासमोर 182 धावांचे लक्ष्य ठेवले. भारतीय संघाकडून सुर्यकुमार यादवने सर्वधिक 53 धावा केल्या. तर, अफगाणिस्तानकडून फजहल फारुकी आणि रशीद खाने प्रत्येकी तीन विकेट घेतल्या. त्यानंतर, लक्ष्याचा पाठलाग करण्यासाठी आलेल्या अफगाणिस्ताना संघ 20 षटकात सर्वबाद होवून 134 धावा करु शकला. भारताकडून बुमराहने सर्वाधिक तीन विकेट घेतल्या. आता भारताचा सुपर 8 मधील दुसरा सामना 22 जूनला बांगलादेशसोबत होणार आहे.

(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)

(The above story first appeared on LatestLY on Jun 20, 2024 11:38 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).