IND vs WI ODI 2022: वनडे मालिकेत नाही घुमणार प्रेक्षकांचा आवाज, रिकाम्या स्टेडियममध्ये रंगणार सामने
कोविड-19 मुळे भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यातील 3 सामन्यांची वनडे मालिका प्रेक्षकांविना खेळली जाणार आहे, असे गुजरात क्रिकेट असोसिएशनने स्पष्ट केले. 3 सामन्यांच्या मालिकेतील पहिला एकदिवसीय सामना देखील भारताचा असेल. विंडीजविरुद्ध हा सामना एकदिवसीय क्रिकेटमधील टीम इंडियाचा 1000 वा सामना असून हा ऐतिहासिक कामगिरी करणारा पहिला संघ असेल.
IND vs WI ODI 2022: भारत (India) आणि वेस्ट इंडिज (West Indies) यांच्यातील 3 सामन्यांची वनडे मालिका कोविड-19 मुळे रिकाम्या स्टेडियममध्ये खेळवली जाणार असल्याची गुजरात क्रिकेट असोसिएशनने (Gujarat Cricket Assosication) पुष्टी केली. एकदिवसीय मालिका अहमदाबादच्या (Ahmedabad) नरेंद्र मोदी स्टेडियमवर 6 ते 11 फेब्रुवारी दरम्यान खेळली जाईल.
Considering the current situation, all the matches will be played behind the closed doors.
— Gujarat Cricket Association (Official) (@GCAMotera) February 1, 2022
(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)
(The above story first appeared on LatestLY on Feb 01, 2022 02:30 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).

