India Reach Asia Cup 2023 Final: श्रीलंकेवर 41 धावांनी विजय मिळवत टीम इंडियाचा आशिया कपच्या फायनलमध्ये दिमाखात प्रवेश

दुनिथ वेलालागेने आज फलंदाजी आणि गोलंदाजी दोन्ही ठिकाणी चांगली कामगिरी केली. दुनिथ वेलालागेने गोलंदाजी करताना भारताच्या 5 विकेट घेतल्या होत्या.

Team India (Image Credit - BCCI Twitter)

आशिया कपच्या सुपर 4 मध्ये भारताने दिलेल्या 214 धावांचा पाठलाग करताना श्रीलंकेचा डाव हा 172 धावांवर संपुष्टात आला. या सामन्यात भारताने 41 धावांनी विजय प्राप्त करत आशिया कपच्या फायनलमध्ये दिमाखात प्रवेश केला आहे.  भारताकडून कुलदिप यादवने 4 तर बुमराह आणि जाडेजा यांनी प्रत्येकी दोन-दोन विकेट घेतल्या. श्रीलंकेकडून दुनिथ वेलालागे (41) आणि धनंजय डि सिल्वा (42) यांनी श्रीलंकेकडून चांगली फंलदाजी करत सामन्यात आशा कायम ठेवल्या होत्या. दुनिथ वेलालागेने आज फलंदाजी आणि गोलंदाजी दोन्ही ठिकाणी चांगली कामगिरी केली. दुनिथ वेलालागेने गोलंदाजी करताना भारताच्या 5 विकेट घेतल्या होत्या.

पाहा पोस्ट -

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement