IND vs SL 1st Test: आऊट होताच विराट कोहली याच्या चेहऱ्याचा उडाला रंग, तर रोहित शर्माने दिली अशी प्रतिक्रिया, मोहाली कसोटीतील Video व्हायरल
भारताचा माजी कर्णधार विराट कोहली आपल्या 100 व्या कसोटीच्या पहिल्या डावात 45 धावांत माघारी परतला. विराटला श्रीलंकेच्या लसिथ एम्बुडियाने बाद केले. विराटने 76 चेंडूंत 5 चौकारांच्या मदतीने 45 धावा केल्या आणि क्लीन बोल्ड झाला. रोहितच्या प्रतिक्रियेवरून तोही विराटच्या 71 व्या शतकाची आतुरतेने वाट पाहत असल्याचे दिसून आले.
भारताचा माजी कर्णधार विराट कोहली (Virat Kohli) आपल्या 100 व्या कसोटीच्या पहिल्या डावात 45 धावांवर बाद झाला. विराटला श्रीलंकन फिरकीपटूने बाद केले तेव्हा तो स्वतःच अवाक झाला नाही, तर कर्णधार रोहित शर्मानेही (Rohit Sharma) कपाळाला हात लावला होता. विराट दोन वर्षांहून अधिक काळ आंतरराष्ट्रीय शतकाची प्रतीक्षा करत आहे आणि टीम इंडिया (Team India) व चाहत्यांना आपल्या 100 व्या कसोटी सामन्यात नक्कीच असे करेल अशी आशा होती.
Rohit Sharma's reaction on Virat Kohli's wicket says it allpic.twitter.com/EvMqzhOSW6
— Cricket Holic (@theCricketHolic) March 4, 2022
(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)
(The above story first appeared on LatestLY on Mar 04, 2022 04:21 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).

