IND vs NZ WTC Final 2021: न्यूझीलंडविरुद्ध (New Zealand) आयसीसी वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप (World Test Championship) फायनल सामन्यात भारतीय संघाचा (Indian Team) दुसरा डाव 170 धावांवर संपुष्टात आला आहे आणि किवी संघाला आता अजिंक्यपदाच्या विजयासाठी 138 धावांचे टार्गेट मिळाले आहे. भारताकडून रिषभ पंतला (Rishabh Pant) वगळता अन्य फलंदाजांनी निराशाजनक कामगिरी केली. पंतने सर्वाधिक 41 धावा केल्या. दुसरीकडे, न्यूझीलंडकडून टिम साउदी (Tim Southee) 4 विकेट्स घेत सर्वात यशस्वी गोलंदाज ठरला. साउदीव्यतिरिक्त ट्रेंट बोल्टने (Trent Boult) 3, काईल जेमीसनने (Kyle Jamieson) 2 आणि नील वॅग्नरला 1 विकेट मिळाली.

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)