IND vs NZ 2nd Test Day 2: मुंबई कसोटीत Ajaz Patel ने केला कहर, 7 वर्षानंतर वानखेडेच्या मैदानात अशी कमाल करणारा बनला पहिला आंतरराष्ट्रीय गोलंदाज

भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील मुंबई कसोटीत फिरकीपटू एजाज पटेलने इतिहास रचला आहे. एजाज भारतीय भूमीवर कोणत्याही कसोटीच्या पहिल्या डावात पाच विकेट घेणारा न्यूझीलंडचा पहिला फिरकी गोलंदाज ठरला आहे. इतकंच नाही तर वानखेडेवर एका डावात पाच किंवा अधिक गडी बाद करणारा तो सात वर्षांतील पहिला आंतरराष्ट्रीय गोलंदाज ठरला.

एजाज पटेल (Photo Credit: Twitter/BLACKCAPS)

भारत (India) आणि न्यूझीलंड (New Zealand0 यांच्यातील मुंबई कसोटीत फिरकीपटू एजाज पटेलने (Ajaz Patel) इतिहास रचला आहे. भारतीय भूमीवर त्याने जी कामगिरी केली आहे, ती आतापर्यंत कोणताही किवी फिरकीपटू करू शकलेला नाही. एजाजने मुंबई कसोटीच्या (Mumbai Test) पहिल्या डावात भारतीय संघाच्या पहिल्या 6 फलंदाजांना तंबूत पाठवले आहे. यासह तो भारतीय भूमीवर कोणत्याही कसोटीच्या पहिल्या डावात पाच विकेट घेणारा न्यूझीलंडचा पहिला फिरकी गोलंदाज ठरला आहे. इतकंच नाही तर वानखेडेवर एका सामन्यात पाच किंवा अधिक गडी बाद करणारा तो सात वर्षांतील पहिला आंतरराष्ट्रीय गोलंदाज ठरला.

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement