IND vs NZ 1st Test Day 3: रिद्धिमान साहाच्या जागी KS Bharat कानपुरच्या ग्रीन पार्कमध्ये विकेकीपिंगला उतरला, जाणून घ्या काय आहे कारण
भारत आणि न्यूझीलंड यांच्यात पहिल्या कसोटी सामन्याच्या तिसऱ्या दिवसाच्या खेळाची कानपुरच्या ग्रीन पार्क स्टेडियमवर सुरुवात झाली आहे. दिवसाच्या सुरुवातीला एक थक्क करणारे दृश्य चाहत्यांना दिसले. संघाचा विकेटकीपर रिद्धिमान साहा मैदानात उतरला नाही आणि त्याच्या जागी श्रीकर भरत (KS Bharat) ग्लोव्हज परिधान करून विकेटकिपिंग करताना दिसला आहे. बीसीसीआयने याबाबत एक मोठा अपडेट दिला.
IND vs NZ 1st Test Day 3: न्यूझीलंडविरुद्ध (New Zealand) कानपुर कसोटीच्या (Kanpur Test) तिसऱ्या दिवशी भारताकडून रिद्धिमान साहाच्या जागी श्रीकर भरत (KS Bharat) विकेटकीपर म्हणून मैदानात उतरला आहे. साहाच्या मानेला दुखापत असून वैद्यकीय पथक त्याच्यावर उपचार करत असून त्याच्या प्रगतीवर लक्ष ठेवून असल्याचे वृत्त बीसीसीआयने दिले आहे.
UPDATE - Wriddhiman Saha has stiffness in his neck. The BCCI medical team is treating him and monitoring his progress. KS Bharat will be keeping wickets in his absence.#INDvNZ @Paytm
— BCCI (@BCCI) November 27, 2021
(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)
(The above story first appeared on LatestLY on Nov 27, 2021 09:42 AM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).

