IND vs SL 3rd T20: तिसऱ्या सामन्यात टीम इंडियाने श्रीलंकेचा 91 धावांनी उडवला धुव्वा, मालिका 2-1 ने घातली खिशात

भारताने श्रीलंकेला विजयासाठी 229 धावांचे लक्ष्य दिले होते.

Team India (Photo Credit - Twitter)

भारत आणि श्रीलंका यांच्यातील तीन टी-20 सामन्यांपैकी तिसरा सामना राजकोटच्या सौराष्ट्र क्रिकेट असोसिएशन स्टेडियमवर खेळला गेला. भारतीय कर्णधार हार्दिक पांड्याने नाणेफेक जिंकून फलंदाजीचा निर्णय घेतला. भारताने श्रीलंकेला विजयासाठी 229 धावांचे लक्ष्य दिले होते. लक्ष्याचा पाठलाग करताना भारतीय संघाने श्रीलंकेचा 91 धावांनी पराभव करत मालिका 2-1 ने जिंकली. प्रथम फलंदाजी करताना टीम इंडियाने 20 षटकांत 5 गडी गमावून 228 धावा केल्या. प्रत्युत्तरात लंकेचा संघ 16.4 षटकांत 137 धावांवर गारद झाला. भारताकडून सूर्यकुमार यादवने 51 चेंडूत नाबाद 112 धावांची खेळी केली. शुभमन गिलने 46 आणि राहुल त्रिपाठीने 35 धावांचे योगदान दिले. श्रीलंकेकडून दिलशान मदुशंकाने दोन बळी घेतले. लंकन संघाकडून कुशल मेंडिस आणि कर्णधार दासून शनाका यांनी फलंदाजी करताना 23-23 धावा केल्या. भारताकडून अर्शदीप सिंहने सर्वाधिक तीन बळी घेतले. हार्दिक पांड्या, उमरान मलिक आणि युझवेंद्र चहल यांना प्रत्येकी दोन यश मिळाले. अक्षर पटेलने एक विकेट आपल्या नावावर केली.

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)