ICC Test Rankings: जो रूट कडून Marnus Labuschagne ने हिसकावले नंबर-1 चे सिंहासन, कसोटी क्रमवारीत घेतली गरुडझेप

मार्नस लाबूशेन आणि बाबर आजम यांनी अनुक्रमे कसोटी व टी-20 आंतरराष्ट्रीय फलंदाजांच्या आयसीसी क्रमवारीत अव्वल स्थान पटकावले आहे. अ‍ॅशेसच्या आतापर्यंतच्या दोन सामन्यांमध्ये जोरदार कामगिरी केल्यानंतर लाबूशेनने प्रथमच फलंदाजांच्या आयसीसी कसोटी खेळाडूंच्या क्रमवारीत अव्वल स्थान पटकावले आहे. करिअरमधील सर्वोत्कृष्ट 912 रेटिंग गुणांसह, त्याने जो रूटला (897) मागे टाकले.

मार्नस लाबूशेन (Photo Credit: PTI)

अ‍ॅशेस मालिकेत (Ashes Series) धमाकेदार फलंदाजीचा स्टार ऑस्ट्रेलियन मार्नस लाबूशेनला  (Marnus Labuschagne) चांगलं फळ मिळाले आहे. ऑस्ट्रेलियाच्या मधल्या फळीतील फलंदाज लॅबुशेनने इंग्लंड कर्णधार जो रूटला (Joe Root) दुसऱ्या स्थानावर ढकलून ICC कसोटी खेळाडूंच्या क्रमवारीत अव्वल स्थान पटकावले. कारकिर्दीतील सर्वोत्कृष्ट 912 रेटिंग गुणांसह त्याने रूटला (897) खाली ढकलले आहे.

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement