Champions Trophy 2025 Theme Song: आयसीसीकडून चॅम्पियन्स ट्रॉफीचे थीम सॉन्ग रिलीज; 'जीतो बाजी खेल के' आतिफ असलमने गायले गाणे (Watch Video)
आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषद (ICC) ने शुक्रवारी पुरुष चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 चे अधिकृत गाणे 'जीतो बाजी खेल के' रिलीज केले.
ICC Champions Trophy 2025 Theme Song: आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने (ICC) शुक्रवारी पुरुष चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 (Champion Trophy 2025) चे अधिकृत गाणे, 'जीतो बाजी खेल के' रिलीज केले. प्रसिद्ध गायक आतिफ असलम (Atif Aslam) यांनी हे गाणे गायले आहे. पुरुष चॅम्पियन्स ट्रॉफी सुरू होण्यास 12 दिवस शिल्लक आहेत. अशा परिस्थितीत, या गाण्याच्या रिलीजमुळे 19 फेब्रुवारी ते 9 मार्च दरम्यान पाकिस्तान आणि यूएईमध्ये होणाऱ्या 15 सामन्यांच्या या स्पर्धेत अधिक उत्साह निर्माण होईल. या कार्यक्रमाचे अधिकृत गाणे अब्दुल्ला सिद्दीकी यांनी तयार केले आहे. ज्याचे बोल अदनान धुळ आणि असफंदयार असद यांनी लिहिले आहेत. हे गाणे छोट्या रस्त्यांपासून ते बाजारपेठांपर्यंत आणि स्टेडियमपर्यंत वैविध्यपूर्ण संस्कृतीचे दृश्य दर्शवतो. (India and England Grand Welcome In Cuttack: दुसऱ्या एकदिवसीय सामन्यापूर्वी भारत आणि इंग्लंड संघ कटकमध्ये दाखल; दोन्ही संघांचे भव्य स्वागत (Watch Video))
आयसीसीकडून चॅम्पियन्स ट्रॉफीचे थीम साँग रिलीज
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)