Jofra Archer: इंग्लंड संघाला मोठा धक्का, जोफ्रा आर्चर या मोसमातही नाही खेळू शकणार एकही सामना

Jofra Archer Injury Update: पाठीच्या खालच्या भागात स्ट्रेस फ्रॅक्चर झाल्याचे निदान झाल्यानंतर, इंग्लंड आणि ससेक्सचा वेगवान गोलंदाज जोफ्रा आर्चरला उर्वरित हंगामातून बाहेर बसावे लागणार आहे. त्याच्या पुनरागमनाची कोणतीही कालमर्यादा निश्चित करण्यात आलेली नसून येत्या काही दिवसात पुढील तज्ञांच्या मतानुसार व्यवस्थापन योजना आखली जाईल.

जोफ्रा आर्चर (Photo Credit: Twitter/@ICC)

जुलै 2021 मध्ये शेवटचा व्यावसायिक सामना खेळणारा इंग्लंडचा (England Cricket Team( वेगवान गोलंदाज जोफ्रा आर्चर (Jofra Archer) यावर्षी पुनरागमन करण्यासाठी उत्सुक होता, परंतु पुन्हा एकदा त्याची दुखापती समोर आली आहे. आर्चर या वर्षी तंदुरुस्त होऊ शकणार नाही कारण त्याच्या पाठीच्या खालच्या भागात स्ट्रेस फ्रॅक्चर (Stress Fracture) झाला आहे आणि त्याला बरे होण्यास वेळ लागेल. अशा स्थितीत त्याला या मोसमात इंग्लंडकडून एकही सामना खेळता येणार नाही.

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)

Share Now

Share Now