Hardik Pandya Out or Not Out: 'तो कसा आऊट झाला?', हार्दिक पांड्याची पत्नी नताशा अंपायरच्या चुकीवर भडकली

या सामन्यात भारतीय डावाच्या 40व्या षटकात हार्दिक पांड्या (Hardik Pandya) क्रीजवर असताना मैदानावर गोंधळ उडाला होता.

Hardik Pandya Out or Not Out: 'तो कसा आऊट झाला?', हार्दिक पांड्याची पत्नी नताशा अंपायरच्या चुकीवर भडकली
Photo Credit - Twitter

IND vs NZ 1st ODI: टीम इंडियाने तीन सामन्यांच्या मालिकेतील पहिल्या एकदिवसीय सामन्यात न्यूझीलंडचा 12 धावांनी पराभव केला. हैदराबादच्या राजीव गांधी स्टेडियमवर बुधवारी युवा सलामीवीर शुभमन गिलने आपल्या एकदिवसीय कारकिर्दीतील पहिले द्विशतक झळकावले. या सामन्यात भारतीय डावाच्या 40व्या षटकात हार्दिक पांड्या (Hardik Pandya) क्रीजवर असताना मैदानावर गोंधळ उडाला होता. या षटकात डॅरिल मिशेलने गोलंदाजी केली. त्याच्या षटकातील चौथा चेंडू ऑफ स्टंपच्या आत आला. स्टंपच्या अगदी चेंडू जवळून गेला पण थर्ड अंपायरने त्याला आउट दिले. पंचांच्या या निर्णयावर चाहत्यांसह क्रिकेटपंडितांनीही टीका केली. त्याचवेळी पांड्याही त्याच्याविरुद्धच्या आऊटच्या निर्णयामुळे संतापलेला दिसत होता. हे एवढ्यावरच संपले नाही, पांड्याची पत्नी नताशा स्टॅनकोविकने (Nataša Stanković) इंस्टाग्रामवर जाऊन तिच्या स्टोरीमध्ये नाराजी व्यक्त केली. तिने लिहिले की, "बॅटला चेंडू लागला नाही, बोल्ड ही झाला नाही, मग तो आऊट कसा झाला?" नताशाची ही पोस्ट पाहताच सोशल मीडियावर व्हायरल झाली.

पहा व्हिडीओ

(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)

(The above story first appeared on LatestLY on Jan 19, 2023 05:07 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).