KKR vs SRH, IPL 2023 Live Score Update: आयपीएलच्या 16व्या मोसमातील हॅरी ब्रूकने झळकावले पहिले शतक, कोलकाताला मिळाले 229 धावांचे लक्ष्य

नाणेफेक गमावल्यानंतर सनरायझर्स हैदराबाद संघाने प्रथम फलंदाजी करताना निर्धारित 20 षटकात 4 गडी गमावून 228 धावा केल्या. सनरायझर्स हैदराबादसाठी सलामीवीर हॅरी ब्रूकने झटपट खेळी करताना शानदार नाबाद धावा केल्या.

KKR vs SRH, IPL 2023 Live Score Update: आयपीएलच्या 16व्या मोसमातील हॅरी ब्रूकने झळकावले पहिले शतक, कोलकाताला मिळाले 229 धावांचे लक्ष्य

इंडियन प्रीमियर लीगच्या 16 व्या मोसमातील 19 वा सामना आज कोलकाता नाईट रायडर्स आणि सनरायझर्स हैदराबाद यांच्यात खेळला जात आहे. उभय संघांमधील हा सामना कोलकात्याच्या ईडन गार्डन्स मैदानावर खेळवला जात आहे. या सामन्यात दोन्ही संघांमध्ये चुरशीची लढत होणार आहे. कोलकाता नाईट रायडर्स आणि सनरायझर्स हैदराबाद या संघांनी मागील सामन्यात विजय मिळवला आहे. अशा स्थितीत दोन्ही संघांना आपली विजयी घोडदौड कायम राखायची आहे. दरम्यान, कोलकाता नाईट रायडर्सचा कर्णधार नितीश राणाने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. नाणेफेक गमावल्यानंतर सनरायझर्स हैदराबाद संघाने प्रथम फलंदाजी करताना निर्धारित 20 षटकात 4 गडी गमावून 228 धावा केल्या. सनरायझर्स हैदराबादसाठी सलामीवीर हॅरी ब्रूकने झटपट खेळी करताना शानदार नाबाद धावा केल्या. कोलकाता नाईट रायडर्सकडून आंद्रे रसेलने सर्वाधिक ३ बळी घेतले. हा सामना जिंकण्यासाठी कोलकाता नाईट रायडर्स संघाला 20 षटकात 229 धावा करायच्या आहेत.

(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)

(The above story first appeared on LatestLY on Apr 14, 2023 09:18 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).