Hardik Pandya Declared Fit: हार्दिक पंड्या घोट्याच्या दुखापतीतून सावरला, IND विरुद्ध AFG देशांतर्गत T20 मालिकेचे नेतृत्व करणार - रिपोर्ट

अष्टपैलू हार्दिक पांड्या घोट्याच्या दुखापतीतून बरा झाला असून तो संघाची जबाबदारी सांभाळू शकतो. तर सूर्यकुमार यादव घोट्याच्या दुखापतीमुळे बाहेर आहे.

Hardik Pandya (Photo Credit - Twitter)

भारताचा अष्टपैलू खेळाडू हार्दिक पंड्या (Hardik Pandya) विश्वचषक 2023 दरम्यान झालेल्या घोट्याच्या दुखापतीतून बरा झाला असून तो अफगाणिस्तानविरुद्धच्या घरच्या टी20 मालिकेत टीम इंडियाचे नेतृत्व करेल. याआधीच्या अहवालात असे म्हटले होते की पांड्या टी-20 आणि इंडियन प्रीमियर लीग (IPL 2024) च्या पुढील आवृत्तीत खेळण्यास साशंक आहे. दरम्यान, टाईम्स ऑफ इंडियाच्या वृत्तानुसार, अष्टपैलू हार्दिक पांड्या घोट्याच्या दुखापतीतून बरा झाला असून तो संघाची जबाबदारी सांभाळू शकतो. तर सूर्यकुमार यादव घोट्याच्या दुखापतीमुळे बाहेर आहे. मात्र, हार्दिक पांड्या अनुपलब्ध झाला आणि रवींद्र जडेजाला कर्णधार बनवले नाही, तर रोहित शर्माला संघाचे नेतृत्व करण्यास सांगितले जाऊ शकते. तर ऋतुराज गायकवाड यांच्या बोटाला दुखापत झाली आहे. ज्यांनी आशियाई क्रीडा स्पर्धेत भारतीय संघाचे नेतृत्व केले.

पाहा पोस्ट -

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)

Share Now

Share Now