Happy Birthday Virender Sehwag: वीरेंद्र सेहवागचा 46 वा वाढदिवस; बीसीसीआयसह आयपीएल फ्रँचायझींकडून शुभेच्छाचा वर्षाव
माजी भारतीय क्रिकेटपटू वीरेंद्र सेहवागचा आज 20 ऑक्टोबर 2024 रोजी वाढदिवस आहे. वीरेंद्र सेहवाग 46 वर्षांचा झाला. सेहवागच्या वाढदिवसानिमित्त त्याला बीसीसीआय आणि अनेक इंडियन प्रीमियर लीग फ्रँचायझींकडून शुभेच्छा मिळाल्या आहेत.
Virender Sehwag Birthday: माजी भारतीय क्रिकेटपटू वीरेंद्र सेहवागचा(Virender Sehwag)आज 20 ऑक्टोबर 2024 रोजी वाढदिवस आहे. वीरेंद्र सेहवाग 46 वर्षांचा झाला. सेहवागच्या वाढदिवसानिमित्त त्याला बीसीसीआय आणि अनेक इंडियन प्रीमियर लीग फ्रँचायझींकडून(IPL) शुभेच्छा मिळाल्या आहेत. टीम इंडीयाचा सर्वात आक्रमक सलामीवीर म्हणून सेहवागची ओळख आहे. त्याने त्याच्या कारकीर्दीत अनेकदा अक्षरश: पहिल्या चेंडूपासून चौकार मारत खेळाला सुरूवात केली आहे. या उजव्या भारतीय सलामीवीराने 2015 मध्ये परत आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतली आणि निवृत्तीनंतर काही आयपीएल फ्रँचायझींसाठी खेळला. सध्या, सेहवाग अनेक संघांसाठी मार्गदर्शकाची भूमिका बजावताना दिसत आहे. ()
वीरेंद्र सेहवागला बीसीसीआयकडून शुभेच्छा
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)